breaking-newsक्रिडा

लू, मरियम, कावा, व्हॅलेरिया यांचा उपांत्य फेरीत प्रवेश

  • 18 वी एनइसीसी डेक्कन आयटीएफ 25000डॉलर महिला टेनिस अजिंक्‍यपद स्पर्धा

पुणे  – एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत चीनच्या जिया-जिंग लू, जॉर्जियाच्या मरियम बोलकवडझ, पोलंडच्या कॅटरझायना कावा, रशियाच्या व्हॅलेरिया सवयिंख या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करताना येथे सुरू असलेल्या डेक्कन जिमखाना क्‍लब यांच्या वतीने आयोजित नॅशनल एग कॉर्डीनेशन कमिटी(एनइसीसी)प्रायोजित आयटीएफ, एआयटीए व एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या 18व्या एनइसीसी डेक्कन आयटीएफ 25000डॉलर महिला टेनिस अजिंक्‍यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.

डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत चीनच्या अव्वल मानांकित जिया-जिंग लू हिने आपली विजयी घौडदौड कायम ठेवत रशियाच्या याशीना इक्तेरीनाचा 7-5, 6-3असा पराभव करून दिमाखात उपांत्य फेरी गाठली. जॉर्जियाच्या मरियम बोलकवडझने आपली अनपेक्षित निकालाची मालिका कायम ठेवत चौथ्या मानंकित लातवियाच्या डायना मर्सीकेविचाचा 6-2, 6-1असा सहज पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली.

रशियाच्या व्हॅलेरिया सवयिंखने मरिना मेलनिकोवाचा 6-2, 6-3असा सरळ सेटमध्ये पराभव करून आगेकूच केली. पोलंडच्या तिसऱ्या मानांकित कॅटरझायना कावा हिने तैपेईच्या ची-यु सुचे आव्हान 6-4, 6-0असे अवघ्या 54मिनिटांत मोडीत काढले.

दुहेरीत उपांत्य फेरीत कॅनडाच्या शेरॉन फिचमनने रशियाच्या व्हॅलेरिया सवयिंखच्या साथीत टर्कीच्या बेरफू सेंगीज व इंडोनेशियाच्या जेस्सी रॉमपीजचा सुपरटायब्रेकमध्ये 6-1, 2-6, 10-6असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. इंडोनेशियाच्या बिट्राईस गुमूल्या व मॉंटेनिग्रोच्या एना वेस्लीनोविक या जोडीने रशियाच्या पोलीना लेकीना लातवियाच्या डायना मर्सीकेविचा या जोड़ीचा 6-3, 6-3असा पराभव केला.

सविस्तर निकाल : उपांत्यपूर्वफेरी : एकेरी गट:

जिया-जिंग लू(चीन)(1) वि.वि. याशीना इक्तेरीना(रशिया) 7-5, 6-3, मरियम बोलकवडझ(जॉर्जिया) वि.वि. डायना मर्सीकेविचा(लातविया)(4) 6-2, 6-1, व्हॅलेरिया सवयिंख(रशिया) वि.वि. मरिना मेलनिकोवा(रशिया) 6-2, 6-3, कॅटरझायना कावा(पोलंड)(3) वि.वि. ची-यु सु(तैपेई) 6-4, 6-0,

दुहेरी गट: उपान्त्य फेरी – शेरॉन फिचमन(कॅनडा)/व्हॅलेरिया सवयिंख(रशिया)(4) वि.वि. बेरफू सेंगीज(टर्की)/जेस्सी रॉमपीज(इंडोनेशिया)(2) 6-1, 2-6, 10-6, बिट्राईस गुमूल्या(इंडोनेशिया)/एना वेस्लीनोविक(मॉंटेनिग्रो) वि.वि. पोलीना लेकीना(रशिया)/डायना मर्सीकेविचा(लातविया) 6-3, 6-3.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button