breaking-newsक्रिडा

राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत विनेश, साक्षी खेळणार

जालंधर येथे २९ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेतील महिला विभागात जागतिक कांस्यपदक विजेती विनेश फोगट (५५ किलो) आणि ऑलिम्पिक पदकविजेती साक्षी मलिक (६२ किलो) प्रमुख आकर्षण ठरणार आहे. पुरुषांमध्ये फ्रीस्टाईल, ग्रीको रोमन आणि महिलांच्या विविध गटांमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत देशातील ५०० कुस्तीपटू सहभागी होणार आहेत.

दिव्या काक्रन (६८ किलो), सीमा बिस्ला (५० किलो), सरिता मोर (५७ किलो) आणि नवज्योत कौर (६५ किलो) या कुस्तीपटूही स्पर्धेत सहभागी होणार आहेत. पुरुषांमध्ये साजन (७७ किलो), गौरव बलियान (७४ किलो), सुमित मलिक (१२५ किलो), सत्यवर्त कडियान (९७ किलो) आणि राहुल मान (७० किलो) यांसारखे मातब्बर कुस्तीपटू या स्पर्धेत त्यांचे कौशल्य दाखवणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button