breaking-newsक्रिडा
राज्य अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धा : जान्हवीला सुवर्ण
मुंबई : वरळी येथील महाराष्ट्र रायफल संघटनेच्या नेमबाजी केंद्रावर सुरू असलेल्या महाराष्ट्र राज्य नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत १० मीटर एअर रायफल प्रकारात महिला गटामध्ये रायगडच्या जान्हवी खानविलकरने सुवर्णविजेती कामगिरी केली. तिने २५०.४ गुणांची कमाई केली. याच गटात रौप्य जिंकणाऱ्या पुण्याच्या नंदिता सुळने कनिष्ठ तसेच युवा गटात मात्र पहिला क्रमांक मिळवला.
निकाल :१० मीटर एअर रायफल (महिला) : १. जान्हवी खानविलकर, २. नंदिता सुळ, ३. नेहा चाफेकर; १० मीटर एअर रायफल ज्युनियर (महिला) : १. नंदिता सुळ, २. भार्गवी कासार, ३. रिशिमा कानडे (पुणे); युवा गट : १. नंदिता सुळ, २. रितुल कुंडले, ३. भार्गवी कासार.