breaking-newsक्रिडा

राज्यस्तरीय सब-ज्युनिअर मुष्टियुद्ध स्पर्धा : रोहित, उमर, पार्थ, कुणाल, लकी यांना सुवर्ण

  • सातारा जिल्ह्याला सर्वसाधारण विजेतेपद 

पुणे – मुलांच्या 36 किलो गटात सातारचा रोहित चौरासिया, 38 किलो गटात पुणे जिल्ह्याचा उमर शेख, 40 किलो गटात पुणे शहराचा रोहित पवार, 42 किलो गटात साताऱ्याचा पार्थ ढोणे, 44 किलो गटात धुळ्याचा नयन सोनावणे, 46 किलो गटात साताऱ्याचा कुणाल माने, 48 किलो गटात मुंबई उपनगरच्या लकी श्रीवास्तव या खेळाडूंनी सुवर्णपदके पटकावताना राज्यस्तरीय पाचव्या सब-ज्युनिअर मुष्टीयुद्ध स्पर्धेचा अखेरचा दिवस गाजविला.

राजबाग, लोणी काळभोर येथील एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्‍नॉलॉजी विद्यापीठाच्या बॉक्‍सिंग हॉलमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी झालेल्या अंतिम फेरीत 36 किलो गटात साताऱ्याचा रोहित चौरासिया याला सुवर्ण तर पुण्याच्या वेदांत बेंगळेला रौप्य, 38 किलो गटात पुणे जिल्हा मुष्टियुद्ध संघटनेचा उमर शेख याला सुवर्ण, तर सातारचा आदित्य जाधव याला रौप्य, 40 किलो वजनी गटात पुणे शहराचा रोहित पवार याला सुवर्ण, तर अकोला शहराचा सुमीत खरात याला रौप्यपदक देण्यात आले.

याशिवाय 42 किलो गटात साताऱ्याचा पार्थ ढोणेला सुवर्ण, तर अकोला शहराचा प्रतीक्ष भालेरावला रौप्य, 44 किलो गटात धुळ्याच्या नयन सोनावणेला सुवर्ण तर नगर जिल्ह्याच्या शुभम कारलेने रौप्य, 46 किलो गटात साताऱ्याचा कुणाल मानेने सुवर्ण, तर पुणे शहराचा सनी कापसेने रौप्य, 48 किलो गटात मुंबई उपनगरच्या लकी श्रीवास्तवने सुवर्ण तर मुंबईच्या क्रीडा प्रबोधिनीचा शाश्वत तिवारीने रौप्य, 50 किलो वजनी गटात ठाणे जिल्ह्याच्या राहुल सिंगने सुवर्ण तर मुंबई उपनगरच्या विकी कामतने, 52 किलो वजनी गटात मुंबईच्या क्रीडा प्रबोधिनीच्या ओंकार चौगुलेने सुवर्ण. तर पुणे शहराच्या चैतन्य पेडणेकरने रौप्यपदक पटकावले.

तसेच 54 किलो गटात साताऱ्याच्या आयुष मोकाशीने सुवर्ण, तर क्रीडा प्रबोधिनीच्या सुयश चौगुले रौप्य, 57 किलो गटात पुण्याच्या कुणाल घोरपडेने सुवणर्, तर सातारचा ओमकुमार फरांडेने रौप्य, 60 किलो गटात पुण्याच्या चैतन्य कोलेकरने सुवर्ण, तर मुंबईचा किरण पवार याला रौप्य, 63 किलो गटात पुणे जिल्ह्याच्या अन्वर मुजावरने सुवर्ण, तर नगरच्या तेजस पारखे याने रौप्य आणि 66 किलो गटात सातारा संघटनेचा अभिवर्धन शर्मा याने सुवर्ण, तर औरंगाबादच्या रणवीर भोसलेने रौप्यपदकाचा मान मिळविला.

सातारा संघ सर्वात्कृष्ट 
या स्पर्धेतील सांघिक गटांत 40 गुणांसह सातारा जिल्हा मुष्टियुद्ध संघाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. पुणे जिल्हा आणि पुणे शहर मुष्टियुद्ध संघाला अनुक्रमे दुसरे आणि तिसरे पारितोषिक मिळाले. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट मुष्टियोद्धा म्हणून साताऱ्याचा कुणाल माने याला गौरविण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button