breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

राजस्थान-कोलकाता आमने-सामने; दोन्ही संघाना विजय आवश्यक

आयपीएल सुपर संडेच्या दुसर्‍या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स हे संघ आमनेसामने असतील. प्ले-ऑफमध्ये पात्र होण्यासाठी दोन्ही संघांना हा सामना जिंकणे आवश्यक आहे. विजयाबरोबरच दोन्ही संघाना नेट रन रेट सुधारणेही गरजेचं असणार आहे. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स आणि कोलकात नाईट रायडर्सचा सामना होणार आहे.

राजस्थानने शेवटच्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबला सात गडी राखून नमवून प्लेऑफमध्ये पोहोचण्याचं आपलं आव्हान कायम ठेवलं आहे. राजस्थान रॉयल्स 13 सामन्यांमध्ये 12 गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे. दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेन्जर्स बंगलोरच्या पराभवामुळे आयपीएल 2020 मध्ये प्लेफसाठी अटीतटीटी लढत पाहायला मिळत आहे. यंदाच्या मोसमात आतापर्यंत 52 सामने खेळले गेले असून आतापर्यंत फक्त एका संघाने म्हणजे मुंबई इंडियन्सने प्ले ऑफमध्ये जागा मिळवली आहे. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच असं झालं आहे.

मागील सामन्यात कोलकाताला किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध पराभवाला सामोरे जावं लागलं होतं. अशा परिस्थितीत राजस्थानविरुद्धच्या या सामन्यात कोलकात आपल्या संघात अनेक बदल करू शकतो. दुसरीकडे राजस्थान रॉयल्सने मुंबई विरुद्ध अखेरचा सामना शानदार विजय मिळवला होता. अशा परिस्थितीत राजस्थान आपल्या संघात काहीही बदल करणार नसल्याची शक्यता आहे.

दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवल्या जाणाऱ्या या सामन्यात हवामान साफ असेल. मात्र खेळाडूंना कडक उन्हाचा सामना करावा लागणार आहे. दव येथे मोठी भूमिका निभावू शकतो. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजीचा निर्णय घेऊ शकेल.

शारजाह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमच्या तुलनेत दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम पूर्णपणे वेगळं आहे. आकाराच्या बाबतीत हे मैदान खुप मोठं आहे. पण आता स्पर्धेच्या सुरूवातीच्या तुलनेत येथील खेळपट्टीत खुप बदल झाला आहे. धावपट्टी आता धीमी बनली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button