Breaking-newsक्रिडा
मेरी कोम उपांत्य फेरीत
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/05/Untitled-15-10-1.jpg)
इंडिया खुली बॉक्सिंग स्पर्धा
सहा वेळा विश्वविजेत्या ठरलेल्या मेरी कोमची आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक मिळवणाऱ्या निखात झरीनशी इंडिया खुल्या बॉक्सिंग स्पर्धेच्या ५१ किलो गटाच्या उपांत्य फेरीत गाठ पडणार आहे.
कर्मवीर नवीन चंद्रा बोडरेली बंदिस्त स्टेडियमवर चालू असलेल्या या स्पर्धेत मंजू राणी, मोनिका आणि एस. कलैयवाणी यांनीसुद्धा ४८ किलो गटाची उपांत्य फेरी गाठून दुसऱ्या दिवशी भारताची पाच पदके निश्चित केली आहेत. त्यामुळे या प्रतिष्ठेच्या बॉक्सिंग स्पर्धेत भारताला एकूण १५ पदके मिळण्याची शक्यता आहे.
लंडन ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेत्या मेरी कोमपुढे नेपाळच्या माला रायचा निभाव लागला नाही. मेरीने ५-० असा विजय मिळवला. निखातनेही अनामिकाला ५-० अशी सहज धूळ चारली.