breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

मिताली राज चक्क साडी नेसून क्रिकेट खेळतेय…

ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिलांनी पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठली आहे. ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनी भारतीय महिला मेलबर्नच्या मैदानात पहिला विश्वचषक उंचावण्याच्या इराद्याने मैदानात उतरतील. भारतीय संघाची माजी कर्णधार आणि टी-२० क्रिकेटमधून निवृती घेतलेल्या मिताली राजने हटके अंदाजात संघाला प्रोत्साहन दिले आहे. भारतीय संघाने विश्वविजेतेपद पटकावून मायदेशी परतावे, अशा आशयाचा संदेश देणारा व्हिडिओ  मितालीने सोशल मीडियाच्या माध्यमातून  शेअर केला आहे. विशेष म्हणजे या व्हिडिओमध्ये ती चक्क साडी नेसून क्रिकेट खेळताना दिसत आहे.  

मितालीने शेअर केलेल्या प्रमोशनल व्हिडिओनंतर ट्विटरवर #MithaliPlaysCricketInSaree ट्रेंड पाहायला मिळाला. याशिवाय मितालीने एका ट्विटच्या माध्यमातून भारतीय महिला संघाचे अभिनंदनही केले आहे. पावसामुळे इंग्लंडवर आलेली परिस्थिती मी समजू शकते. अशी परिस्थिती आपल्या संघावर येऊ नये, असेही तिने म्हटले आहे. मिताली राजने काही दिवसांपूर्वीच टी-२० क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. तिच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने तीनवेळा विश्वचषकाची सेमीफायनल खेळली होती. यंदाच्या स्पर्धेत भारतीय महिला संघाने अडथळा बाजूला करत फायनल गाठली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button