Breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी
महेंद्रसिंग धोनीचा ‘BoX Jump’ चा व्हिडिओ पाहिलात का ?
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/Untitled-24.png)
भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा विश्वचषक २०१९ च्या नंतर क्रिकेटपासून दूर आहे. मधल्या काळात धोनीच्या पुनरागमनाच्या अनेक चर्चा रंगल्या. काही वेळा तर त्याच्या निवृत्तीच्या चर्चांनाही उधाण आले. पण आता मात्र धोनी क्रिकेटच्या मैदानावर परतण्यासाठी सज्ज झाला आहे. IPL 2020 मध्ये आपल्या चेन्नई संघाचे नेतृत्व करण्यासाठी धोनी मैदानात उतरणार आहे. त्या आधी धोनीचा एक भन्नाट व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
मैदानावर धोनी जितका शांत असतो, तितकाच चपळदेखील असतो. वयाच्या पस्तीशीनंतरही त्याच्या मैदानावरील हालचाली अनेकांना थक्क करणाऱ्या असतात. या साठी धोनी कायम परिश्रम घेत असतो. तसेच नवे नवे व्यायाम प्रकार करून स्वत:ला तंदुरुस्त ठेवत असतो. अशाच एका व्यायामप्रकाराचा (बॉक्स जम्प) व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.