Breaking-newsक्रिडा
महाराष्ट्र केसरी स्पर्धा २०२०: रामचंद्र काबंळेने पटकावलं सुवर्णपदक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/maharashtra-kesari.jpg)
पुणे | महाईन्यूज
म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडानगरीत सुरू असलेल्या ६३ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत शनिवारी गादी विभागातील ७९ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीतील लढतीत सोलापूरच्या रामचंद्र कांबळे याने उस्मानाबादच्या रवींद्र खैरे याचा पराभव करत सुवर्णपदकांची कमाई केली आहे.
रामचंद्र याने रवींद्रचा १४-३ असा पराभव केला. त्यामुळे रवींद्रला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले आहे. या गटात केवल भिंगारे आणि श्रीधर मुळीक यांनी कांस्यपदक पटकावले आहे.