breaking-newsक्रिडा

मल्लेश धनगर ठरला ‘श्री 2018’चा मानकरी

पुणे – क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे एकता प्रतिष्ठान यांच्या विद्यमाने आणि इंडियन बॉडी बिल्डर्स फेडरेशन, महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशन पुणे आणि पिंपरी-चिंचवड बॉडी बिल्डिंग अॅन्ड फिजिक स्पोर्टस असोसिएशन यांच्या मान्यतेने जनरल अरुणकुमार वैद्य स्टेडियम येथे 29 डिसेंबर रोजी शरीरसौष्ठव स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

अय्यंगार इन्स्टिट्यूटचे योग प्रशिक्षक नंदु पवार आणि माजी गृह राज्यमंत्री रमेश बागवे यांच्या हस्ते वस्ताद लहुजी साळवे यांच्या प्रतिमेचे पूजन करून या स्पर्धेचे उद्‌घाटन करण्यात आले.

या स्पर्धेत मल्लेश धनगर याला विजेता घोषित करण्यात आले. ही स्पर्धा सात वजनी गटांमध्ये आयोजित करण्यात आली होती. मानाच्या क्रांतिवीर लहुजी वस्ताद श्री 2018 या स्पर्धेसाठी शहर आणि जिल्ह्यातील शरीरसौष्ठव पटूंनी सहभाग घेतला. गेल्या 24 वर्षांपासून ही स्पर्धा आयोजित केली जाते. या स्पर्धेतील विजेत्याला अभिनेता, दिग्दर्शक प्रवीण तरडे, आणि बागवे यांच्या हस्ते 11 हजार रुपये रोख, चषक, प्रशस्तीपत्रक, शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करयात आला. उपविजेत्याचे पारितोषिक राजू भडाळे यांना तर बेस्टपोझर पारितोषिक अप्पासाहेब वेतम या शरीरसौष्ठव पटूला देण्यात आले. मोस्ट इम्प्रुव्ह बॉडीबिल्डर किताब तौसिफ मोमिन यांना देण्यात आला. नगरसेवक अविनाश बागवे हे या कार्यक्रमाचे संयोजक होते. त्यांनी या स्पर्धेसाठी विशेष परिश्रम घेतले.

या कार्यक्रमाला उल्हास पवार, बाळासाहेब शिवरकर आणि मोहन जोशी हे माजी आमदार, लता राजगुरू, अशोक कांबळे, रफिक शेख, किरण दगडे-पाटील, अशोक पवार, नुरुद्दीन सोमजी, मेहबूब नदाफ, संदीप लडकत, मंजूर शेख, रफिक खिजर, यासेर बागवे, मदन वाणी, रवी पाटोळे, विठ्ठल थोरात, सुरेश अवचिते आदी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button