भारत वि. वेस्टइंडीज : दुसऱ्या दिवसांचा खेळ समाप्त, दिवसअखेर वेस्टइंडीज 6 बाद 94
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/10/wst-696.jpg)
नवी दिल्ली – भारत वि. वेस्ट इंडीज यांच्यात राजकोट येथील सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यातील दुसरा दिवसाचा खेळ थांबला तेव्हा वेस्टइंडीज संघाच्या 6 बाद 94 धावा झालेल्या आहेत. वेस्ट इंडीज संघ अजूनही 555 धावांनी पिछाडीवर आहे.
#TeamIndia in full control of this Test match as West Indies finish on 94/6 at Stumps on Day 2.
Windies trail by 555 runs with 4 wickets remaining in the innings.
Updates – https://t.co/RfrOR84i2v @Paytm #INDvWI pic.twitter.com/avRk0WGAm1
— BCCI (@BCCI) October 5, 2018
भारतीय गोलंदाजीसमोर वेस्ट इंडीजच्या एकाही फलंदाजाला टिकून राहता आले नाही. दुसऱ्या दिवसाअखेर वेस्टइंडीज संघाची 6 बाद 94 अशी अवस्था झाली आहे. भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने 2 तर रविचंद्रन आश्विन, रविंद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. तर वेस्ट इंडीजच्या एका फलंदाजाला जडेजाने धावबाद केले.
दरम्यान भारत विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यात सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाने जबरदस्त कामगिरी केली आहे. भारतीय संघाने 649-9 धावांवर आपला पहिला डाव घोषित केला. विराट कोहलीआणि रविंद्र जडेजा यांच्या शतकी खेळ्या आजच्या दिवसाचे वैशिट्य ठरले. रिषभ पंत याचे शतक केवळ 8 धावांनी हुकले. तो 92 धावांवर बाद झाला.