Breaking-newsक्रिडा
भारतीय महिलांना आघाडी वाढवण्याची संधी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/09/spt03-12-1.jpg)
- भारत-द. आफ्रिका महिला क्रिकेट
सुरत : भारत-दक्षिण आफ्रिका महिला संघांमधील दुसरा ट्वेन्टी-२० क्रिकेट सामना एकही चेंडू न टाकता पावसामुळे रद्द करण्यात आला. पण पहिल्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर ११ धावांनी विजय मिळवला होता. आता पाच सामन्यांच्या मालिकेमधील रविवारी रंगणाऱ्या तिसऱ्या सामन्यात विजय मिळवून आघाडी वाढवण्याची संधी भारतीय महिलांना आहे.
युवा फलंदाज शेफाली वर्मा हिला पहिल्या सामन्यात खातेही खोलता आले नव्हते. दीप्ती शर्मा हिने केलेल्या सुरेख गोलंदाजीमुळे भारताने विजय मिळवला होता.
सामन्याची वेळ : रात्री ७ वा.
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स ३