भारतीय क्रिकेटपटू जयदेव उनादकट विवाहबंधनात अडकला
![Indian cricketer Jaydev Unadkat tied the knot](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/02/unadkatengage_b_16.jpg)
नवी दिल्ली – भारतीय क्रिकेटपटू जयदेव उनादकट विवाहबंधनात अडकला आहे. मंगळवारी रात्री गुजरातच्या आणंद शहरातील मधुबन रिसॉर्टमध्ये उनादकटने रिनीसह लग्नगाठ बांधली. मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या लग्नसोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, लग्नासाठी जयदेव आणि रिनी यांचे कुटुंबीय मागील दोन-तीन दिवसांपासून आणंद शहरात आहेत. सोमवारी त्यांच्या संगीत सेरिमनीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर मंगळवारी त्यांचा विवाहसोहळा संपन्न झाला. दरम्यान, उनादकट आणि रिनी गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांच्या प्रेमात होते. १५ मार्च २०२० रोजी त्यांचा साखरपुडा झाला होता. जयदेवने सोशल मीडियावरून आपल्या साखरपुड्याची माहिती दिली होती.
https://www.instagram.com/p/CKzTRwcsozf/?utm_source=ig_embed
उनादकटची पत्नी रिनी वकील आहे. तर साखरपुड्याच्या दोन दिवस आधी उनादकटच्या नेतृत्त्वात सौराष्ट्र संघाने रणजी चषकावर नाव कोरले होते. त्याला भारतीय संघाकडून जास्तवेळ खेळयला मिळाले नाही. मात्र तो आयपीएलमधील एक स्टार खेळाडू आहे. शिवाय त्याने २०१० साली अंडर -१९ संघाचे नेतृत्त्वही केले आहे.