breaking-newsक्रिडा

बेभरवशी DLS ला भारतीय पर्याय; ICC ची १७ वर्ष नकारघंटा

इंग्लडमध्ये सुरू असलेला विश्वचषक पाऊस आणि डर्कवर्थलुईस नियमामुळे बराच चर्चेत आला. याच डर्कवर्थलुईसमधील दोष एका भारतीयाने आयसीसीला दाखवून नवा पर्याय शोधून दिला. पण, गेल्या १७ वर्षांपासून आयसीसी त्याला नकार देतेय. डर्कवर्थलुईसवर पर्याय शोधणाऱ्या भारतीय व्यक्तीचे नाव आहे, व्ही. जयदेवन.

क्रिकेट सामन्यादरम्यान पावसाचा व्यत्यय  आल्यानंतर येणाऱ्या डर्क वर्थ लुईसला केरळमधील  थिसूरमध्ये राहणाऱ्या व्ही. जयदेवन यांनी अचूक पर्याय शोधला आहे. व्हीजेडी पद्धत असं त्याने शोधलेल्या पद्धतीच नाव आहे. डर्कवर्थलुईसपेक्षा व्हीजेडी पद्धत चांगली आणि अचूक असल्याचे जयदेवन यांचे मत आहे.

याविषयी बोलताना जयदेवन म्हणाले, ‘व्हीजेडी ही पद्धत अपघातानेच पुढे आली. फॉरटन प्रोग्रॅमिंग लॅग्वेज शिकवण्याची विनंती माझ्या एका मित्राने मला केली. मग मी त्या प्रॉब्लेमवर लक्ष दिले. टार्गेट स्कोर निश्चित करण्याच्या या पद्धतीला मी त्यावेळी गांभीर्याने घेतले नाही. १९९९ मध्ये डकवर्थलुईसचे दोन लेख माझ्या वाचण्यात आले. एक डकवर्थ लुईसचे फायदे आणि दुसरा तोटे. त्यावेळी मला माझी पद्धत यापेक्षा चांगली असल्याचे जाणवलं.’

जयदेवन यांनी आयसीसीला व्हीजेडी पद्धतीबद्दल माहिती दिली. मात्र, आयसीसीने त्याला अयोग्य करार दिला. त्यावर २००० मध्ये जयदेवन यांनी क्रिकेट कमिटीसमोर व्हीजेडी पद्धतीचे सादरीकरण करण्याची विनंती केली. माझी पद्धत चांगली आहे असे मी आयसीसीला म्हटले नाही किंवा डकवर्थलुईस ऐवजी याचा वापर करा असेही म्हटले नाही. फक्त मला एक संधी द्या. माझी पद्धत चांगली आणि अचूक आहे का? हे एकदा पहा. ऐवढीच माझी विनंती होती. पण आयसीसीने प्रत्येकवेळा माझी विनंती फेटाळली असे जयदेवन म्हणाले.

गेल्या दहा वर्षांपासून जयदेवन डकवर्थ लुईस नियमातील उणिवा सतत काढत आहे. आणि त्या आयसीसीला पाठवत आहेत. जेणेकरून क्रिकेट कमिटी यामध्ये वेळेवेळी सुधारणा करेल. पण जेव्हा जेव्हा मी एखाद्या बाबीची सुधारणा सांगतो, त्यावेळी मला आणखी दुसऱ्याही सुधारणा दिसतात. त्यानंतर वारंवार आयसीसीला चुका दाखवून देत आहे. डकवर्थ लुईस नियमामधील चुका काढण्यासाठी आयसीसी माझा वापर करत आहे असे जयदेवन यांनी The Quint शी बोलताना म्हटलेय.

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button