बेनिटेझ इतिहासामुळे चिंतेत
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/rafa-banetej-.jpg)
लिव्हरपूल– लिव्हरपूल संघाचे माजी प्रशिक्षक राफा बेनिटेझ यांनी तेथील फुटबॉल क्लबच्या मैदानावर हजेरी लावली. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी लिव्हरपूल संघाला त्यांच्या प्रशिक्षक काळातील इतिहासाची आठवण करून दिली तर सध्याचे प्रशिक्षक जुरगोन क्लोप यांना वर्तमान काळाला जास्त महत्व दिले. बेनिटेझ हे 2006 ते 2010 या काळात लिव्हरपूलचे मुख्य प्रशिक्षक होते. तर 1990 नंतर लिव्हरपूलला प्रीमियर लीगचे विजेतेपद पटकाविता आलेले नाही.
मागील दहा वर्षांचा इतिहास पहिला तर प्रीमियर लीगमध्ये ख्रिसमसच्या वेळी जो संघ अव्वल त्या संघान ेदहापैकी आठवेळा विजेतेपद पटकाविले आहे. परंतु, ज्या दोन वेळा तो संघ जिंकला नाही त्या दोन्ही वेळा तो संघ लिव्हरपूलचाच होता. या वर्षी ख्रिसमसच्यावेळी लिव्हरपूल संघ पुन्हा अव्वल असल्याने बेनिटेझ यांना इतिहासाची पुनरावृत्ती होण्याची चिंता सतावत आहे. पण सध्याचा संघ आघाडी आणि बचावामध्ये संतुलित आहे. त्यामुळे लीग जिंकण्याची अशा जास्त आहे. परंतु, दुसऱ्या स्थानी असलेला मॅंचेस्टरसिटीचा संघ त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरू शकतो.