क्रिडा
बीडचा अविनाश साबळे चमकला, स्टीपलचेस शर्यतीत मिळवलं ऑलिम्पिक तिकीट
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/10/Avinash-Sable.jpg)
मुळचा बीडचा आणि सध्या भारतीय लष्करात हवालदार पदावर काम करणाऱ्या, अविनाश साबळेने दोहा येथे सुरु असलेल्या जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत ३००० मी. स्टीपलचेस शर्यतीत सर्वोत्तम वेळ नोंदवत टोकियो ऑलिम्पिकचं तिकीट मिळवलं आहे. अविनाशने आपला राष्ट्रीय विक्रम मोडत ८:२१:३७ अशी वेळ नोंदवली. ३००० मी. शर्यतीत नवीन विक्रम प्रस्थापित करण्याची अविनाशची गेल्या वर्षभरातली ही चौथी वेळ ठरली आहे.