breaking-newsक्रिडा

फिफा विश्‍वचषक : बेल्जियम-इंग्लंड अंतिम लढत रंगणार?

सेंट पिटर्सबर्ग – फिफा विश्‍वचषक फुटबॉल स्पर्धा अंतिम टप्प्यात आलेली असून आता केवळ चार संघच विश्‍वचषक विजयाचे दावेदार समजले जात आहेत. यात माजी विजेता इंग्लंड व फ्रान्स, तसेच प्रथमच उपान्त्य फेरी गाठणारे क्रोएशिया व बेल्जियम महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडणार आहेत. विश्‍वचषकात नेहमीच युरोपियन व दक्षिण अमेरिकन संघांमध्येच खरी लढत होत असते. उरुग्वे व ब्राझिलच्या पराभवामुळे दक्षिण अमेरिकेचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले असून आता युरोपियन संघच स्पर्धेत राहिले आहेत.

पहिला उपान्त्य सामना फ्रान्स व बेल्जियम यांच्यामध्ये आज रंगणार असून दुसरा उपान्त्य सामना उद्या (बुधवार) इंग्लंड व क्रोएशिया यांच्यात होत आहे. गेल्या एक महिन्याच्या काळात या स्पर्धेत बऱ्याच नाटयमय घडामोडी घडल्या. विश्‍वचषक स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच जर्मनी, इटली, अर्जेटिना, स्पेन, ब्राझिल, उरुग्वे या माजी विजेत्यांशिवाय विश्‍वचषकाचा उपान्त्य व अंतिम सामना होत आहे.

विशेष म्हणजे उपान्त्य फेरीत प्रवेश केलेला बेल्जियम विश्वक्रमवारीत तिसऱ्या, फ्रान्स सातव्या, इंग्लंड 13व्या तर क्रोएशिया 20व्या स्थानावर आहे. यापूर्वी इंग्लंडने 1966 मध्ये, तर फ्रान्सने 1998 मध्ये विश्‍वचषक जिंकलेला आहे. मात्र यंदाच्या स्पर्धेतील कामगिरी पाहाता इंग्लंड आणि बेल्जियमचे संघ इतर संघांपेक्षा वरचढ ठरलेले दिसून येत आहेत. त्यामुळे यंदाच्या विश्‍वचषकाची अंतिम लढत इंग्लंड व बेल्जियम या दोन संघांमध्येच होईल असे भाकित फुटबॉलप्रेमी, तसेच जाणकार व्यक्‍त करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button