breaking-newsक्रिडा

फिफा विश्‍वचषक : पोर्तुगाल-स्पेन यांच्यात चुरशीची झुंज अपेक्षित

सामन्याची वेळ- रात्री 11.30 पासून

सोची – युरोपियन विजेते पोर्तुगाल आणि त्यांचे सख्खे शेजारी स्पेन यांच्यात फिफा विश्‍वचषक फुटबॉल स्पर्धेतील पहिलीवहिली गटसाखळी लढत आज रंगणार असून बऱ्याच बाबतीत तुल्यबळ असलेल्या संघांमधील हा सामना चुरशीचा होईल असाच जाणकारांचा अंदाज आहे. जगातील सध्याचा अग्रगण्य खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या कारकिर्दीतील ही बहुधा अखेरचीच विश्‍वचषक स्पर्धा असल्यामुळे पोर्तुगालला जगज्जेतेपद मिळवून देण्याची त्याला ही निर्णायक संधी आहे. परंतु या मोहिमेतील सलामीच्याच लढतीत रेयाल माद्रिद संघातील, मात्र या स्पर्धेत स्पेनच्या संघातून खेळणाऱ्या त्याच्या सहा सहकाऱ्यांशी झुंज देण्याचे आव्हान रोनाल्डोला पेलायचे आहे. अर्थात रोनाल्डोला आपल्यासमोरील आव्हानांची पुरेपूर जाणीव आहे.

दरम्यान स्पेनच्या संघातील खेळाडू अद्याप प्रशिक्षकांच्या हकालपट्टीच्या धक्‍क्‍यातून सावरलेले नाहीत. विश्‍वचषक स्पर्धा जेमतेम 24 तासांवर आली असताना स्पेनच्या व्यवस्थापनाने मुख्य प्रशिक्षक जुलेन लोपेटेगुई यांची तडकाफडकी हकालपट्टी करून खळबळ उडविली. विश्‍वचषक स्पर्धेनंतर लोपेटेगुई रेयाल माद्रिद संघाचे प्रशिक्षकपद स्वीकारणार असल्याचे उघड झाल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. म्हणजेच लोपेटेगुई पुढच्या महिन्यापासून रोनाल्डोच्या साथीत कामगिरीला प्रारंभ करतील.

आता आजच्या लढतीत लोपेटेगुई यांच्या स्पेन संघासमोर रोनाल्डोच्या पोर्तुगाल संघाचे आव्हान असल्यामुळे हितसंबंधांची गल्लत होण्याची शक्‍यता ध्यानात घेऊन स्पेनने त्यांना त्वरित बाहेरचा रस्ता दाखविला असला, तरी खेळाडूंची नाराजी लपून राहिलेली नाही. स्पेनच्या संघातील या खळबळीचा फायदा पोर्तुगाल संघाने घेतला नाही तरच नवल. तरीही आपल्याला स्पेनच्या अंतर्गत बाबींशी देणेघेणे नसून दोन संगांमधील श्रेष्ठत्वाच फैसला उद्या मैदानावरच होईल, असे सांगताना रोनाल्डोने आत्मविश्‍वासाचे दर्शन घडविले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button