फिफा विश्वचषक : रशियासमोर इजिप्तसह सालाहचेही आव्हान
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/New-Logo-for-2018-FIFA-World-Cup-Russia-1-1.jpg)
सेंट पीटर्सबर्ग – उद्घाटनाच्या चाचणीत उत्तीर्ण झालेल्या यजमान रशियासमोर फिफा विश्वचषक स्पर्धेतील आज (मंगळवार) रंगणाऱ्या दुसऱ्या साखळी लढतीत इजिप्तचे आव्हान आहे. विश्वक्रमवारीत 70व्या स्थानावरील रशियाला 45 व्या स्थानावरील इजिप्तसह सध्याचा सनसनाटी फॉरवर्ड मोहम्मद सालाहला रोखण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे.
दुखापतग्रस्त असल्याने सालाह खेळण्याची शक्यता खूपच कमी होती. परंतु डॉक्टरांनी नुकतेच सालाहला तंदुरुस्त घोषित केले आहे. सालाहने आपल्या सहकाऱ्यांसोबत सरावात भाग घेतला. परंतु तो दुखापतीतून अद्याप सावरत असल्यामुळे महत्त्वाच्या सामन्यांसाठी त्याला राखून ठेवण्याचा इजिप्तचा प्रयत्न राहील.
परिणामी रशियाविरुद्ध गरज भासल्यासच सालाह मैदानात उतरेल असे दिसते. तरीही उरुग्वेविरुद्ध सालाहला बाजूला ठेवण्याचा निर्णय इजिप्तवर उलटला होता, हा भूतकाळ फार जुना नसल्याने या वेळी तसा धोका इजिप्त संघ पत्करणार का हीच उत्सुकतेची बाब राहील. आजच्या सामन्यातील पराभव इजिप्तचे भवितव्य निश्चित करमारा ठरणार असल्याने सालाहलाही सर्वस्व पणाला लावावे लागेल