breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

नाद करायचा नाय, सुपरओव्हरमध्ये टीम इंडियाचा विजय

नवी दिल्ली | सुपर ओव्हरपर्यंत ताणल्या गेलेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात अखेरच्या चेंडूवर रोहितने मारलेल्या षटकारामुळे टीम इंडियाने न्यूझीलंडवर विजय मिळवला. या विजयाबरोबरच टीम इंडियाने टी-२० मालिका आपल्या खिशात घातली आहे. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या सामन्यात प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. टीम इंडियाने हा सामना जिंकून विदेशात दोन द्विपक्षीय मालिकांत तीनहून अधिक सामने जिंकणारी जगातील पहिली टीम बनली आहे.

तत्पूर्वी, रोहित शर्मा (६५), कर्णधार विराट कोहली (३८) आणि के एल राहुल (२७) यांच्या फलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाने निर्धारित २० षटकांत ५ बाद १७९ धावा केल्या आहेत. न्यूझीलंडला विजयासाठी १२० चेंडूत १८० धावा करायच्या आहेत. तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने टीम इंडियाला प्रथम फलंदाजीचे निमंत्रण दिले. रोहित शर्मा आणि के एल राहुलने यापूर्वीच्या सामन्यांप्रमाणेच आक्रमक सलामी दिली.

दोघांमध्ये रोहित कमालीचा आक्रमक दिसला. राहुल बाद झाल्यानंतर टीम इंडियाच्या विकेट्स एकापाठोपाठ एक गेल्या. त्यामुळे मोठी धावसंख्या उभारली जाईल असे वाटत असतानाच दिग्गज फलंदाज बाद झाल्याने टीम इंडियाची धावसंख्या २० षटकांत १७९ धावांवर मर्यादित राहिली. रवींद्र जडेजा १० तर मनीष पांडे १४ धावांवर नाबाद राहिले. न्यूझीलंडकडून हॅमिश बेनेटने ५४ धावांत ३ बळी घेतले. त्याला सँटनर आणि ग्रँडहोमने १-१ बळी घेत साथ दिली.

दरम्यान, न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेत टीम इंडियाला फलंदाजीचे निमंत्रण दिले होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button