breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

धोनीच्या चाहत्यांसाठी एक गुड न्यूज…धोनी लवकरच करणार संघात पुनरागमन ?

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या चाहत्यांसाठी एक गुड न्यूज आहे. कारण धोनी लवकरच संघात पुनरागमन करणार असल्याचं समजतय…मात्र धोनीने स्व:ता याबाबत काही माहिती दिलेली नाहीये…

टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी निवृत्ती घेणार की नाही, घेणार तर कधी घेणार, तो टीम इंडियाकडून अखेरचा सामना खेळणार की मैदानाबाहेरच निवृत्ती जाहीर करणार, आदी अनेक प्रश्न चाहत्यांना सर्वांना पडला होता. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं म्हणजे बीसीसीआय नुकत्याच जाहीर केलेल्या सेंट्रल काँट्रॅक्टमधून धोनीला वगळले आहे. त्यानंतर धोनीला निवृत्तीचे संकेत देण्यात आले, असाही अर्थ लावण्यात आला .

सध्याच्या घडीला धोनी विश्रांती घेत आहे. इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकानंतर धोनीने एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. धोनी यापुढे मैदानात दिसणार की नाही, ही चिंता त्याच्या चाहत्यांना सतावत होती. त्याचबरोबर धोनी कधी पुन्हा क्रिकेटच्या मैदानात उतरणार, याची क्रिकेट जगताला उत्सुकता होती. काहींनी तर धोनी आता मैदानात न उतरताच निवृत्ती घेणार असल्याच्या अफवाही पसरवल्या होत्या. त्यामुळे धोनीच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते.

आगामी इंडियन प्रीमिअर लीग ही धोनीच्या भविष्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची आहे. तसेच निवड समिती, कर्णधार सर्वांचे आपल्याकडे लक्ष असल्याची जाण धोनीलाही आहे. निवृत्तीचा निर्णय हा त्याच्याच हाती आहे. त्यामुळे तो पुन्हा मैदानात खेळताना दिसणार की नाही हे येणा-या दिवसात समजेलचं…

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button