breaking-newsक्रिडाताज्या घडामोडीराष्ट्रिय

धक्कादायक! दरोडेखोरांचा हल्ला, क्रिकेटपटू सुरेश रैनाच्या काकांचे निधन

चंदिगढ: दरोडेखोरांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्यात क्रिकेटपटू सुरेश रैना याच्या काकांचे निधन झालेले आहे. रैनाच्या काकीसह कुटुंबातील चार सदस्य जखमी झालेले आहेत. याच कारणास्तव सुरेश रैना आयपीएलमधून माघार घेत मायदेशी परतल्याचे बोलले जात होते. चेन्नईचा धडाकेबाज खेळाडू सुरेश रैना आयपीएलमध्ये खेळणार नसल्याचे वृत्त समोर आल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसलेला होता. रैना काल तातडीने संयुक्त अरब अमिराती अर्थात UAE वरुन परतला आहे. वैयक्तिक कारणात्सव त्याने माघार घेतल्याची माहिती सुरुवातीला समोर आलेली होती.

पंजाबच्या पठाणकोट जिल्ह्यात राहणाऱ्या रैनाच्या काकांच्या कुटुंबावर शुक्रवारी रात्री दरोडेखोरांनी हल्ला केला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुख्यात “काले कच्छेवाला” टोळीचे तीन ते चार दरोडेखोर चोरीच्या इराद्याने आलेले होते. पठाणकोटमधील माधोपूरजवळील थारियाल गावात राहणाऱ्या अशोक कुमार आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांवर टोळीने हल्ला केलेला होता.

हल्ल्याच्या वेळी कुटुंबातील सर्व जण आपल्या घरातील गच्चीवर झोपलेले होते. 58 वर्षीय अशोक कुमार यांच्या डोक्याला दुखापत झाल्याने त्याच रात्री त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिलेली आहे. घरातील काही रोकड आणि सोने लुटून दरोडेखोरांनी धूम ठोकली आहे. अशोक कुमार यांच्या 80 वर्षीय मातोश्री सत्या देवी, पत्नी आशा देवी, मुले अपिन आणि कौशल जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. सत्या देवी यांना रुग्णालयातून घरी सोडले आहे, तर इतरांवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. सुरेश रैना आणि अशोक कुमार कुटुंबातील नातेसंबंध सुरुवातीला अस्पष्ट होते, मात्र काल रात्री पोलिसांनी त्यास दुजोरा दिला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button