दियागो कार्लोसला आणखी दोन सामन्यांची बंदी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/11/Diego-Carlos-.jpg)
पुणे– इंडियन सुपर लीगमधील संघ फुटबॉल क्लब पुणे सिटीचा खेळाडू दियागो कार्लोस डी ओल्व्हेरा याला ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनच्या शिस्तभंग समितीच्या कायद्याच्या आर्टिकल 48 नुसार “गंभीर उल्लंघन’ आणि आर्टिकल 49 नुसार “विरोधी खेळाडूंशी गैरवर्तन’ यामुळे तीन सामन्यांची बंदी आणि 2 लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.
इंडियन सुपर लीगमधील 21 वा सामना एफसी गोवा आणि एफसी पुणेसिटी यांच्यात 28 ऑक्टोबरला झाला होता. या सामन्यात पुणे सिटीचा खेळाडू दियागो कार्लोस याने विरोधी खेळाडूला चुकीच्या पद्धतीने अडवले. त्यामुळे त्याला रेड कार्ड दाखवण्यात आले. त्यामुळे पुणे सिटीचा घरच्या मैदानावरील 2 नोव्हेंबरच्या सामन्याला तो मुकला होता. ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनच्या शिस्तभंग समितीने सामन्यातील पंचांचा अवहाल आल्यावर आपली कारवाई करत दियागो कार्लोसला दंड ठोठावला. त्यामुळे तो पुणे सिटी च्या पुढील दोन सामन्यास खेळनार नाही.
पुण्याने पाच सामन्यांमध्ये दोन सामन्यात बरोबरी साधली असून त्यांना तीन पराभव पत्करावे लागले आहेत. दोन गुणांसह त्यांनी तळातील स्थान एक क्रमांक वर नेत गतविजेत्या चेन्नईयीन एफसीला मागे टाकले. चेन्नईयीन आता पाच सामन्यांत एक बरोबरी व चार पराभवांमुळे एका गुणासह तळाच्या स्थानावर गेला आहे. तर, पुण्याक्ष्च्या संघाला अद्यापही आपल्या पहिल्या विजयाची प्रतिक्षा असतानाच दियागो सारख्या अव्वल दर्जाच्या स्ट्रायकरला दोन सामन्यांसाठी बाहेर ठेवणे पुण्याच्या संघाला कितपत परवडेल हे सांगणे कठीण आहे.