Breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी
दिनेश कार्तिकनं सोडलं KKRचं कर्णधारपद;आता संघाची जबाबदारी इयोन मोर्गनकडे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/इयोन-मोर्गन.jpg)
कोलकाता नाईट रायडर्स संघात एक मोठा बदल करण्यात आला आहे. संघ व्यवस्थापांनी यासंदर्भात खुलासा केला आहे. त्यांनी सांगितल्यानुसार, केकेआरचा कर्णधार कार्तिकने आपलं कर्णधार पद इयोन मोर्गनकडे सोपवलं आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या वतीने सांगण्यात आलं आहे की, ‘दिनेश कार्तिकने संघ व्यवस्थापकांना माहिती दिली आहे की, ‘आपल्या फलंदाजीवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी आणि संघाचा उद्देश पूर्ण करण्यासाठी त्याने इयोन मोर्गनकडे आपल्या कर्णधार पदाची जबाबदारी सोपावली आहे.’
दिनेश कार्तिकने आयपीएलच्या या सीझनमध्ये आतापर्यंत फक्त एकाच सामन्यात अर्धशतक फटकावलं आहे. परंतु, त्यानंतर मात्र दिनेश कार्तिक आतापर्यंत फारशी चांगली कामगिरी करू शकला नाही. दरम्यान, कोलकाताचा संघ आतापर्यंत सातपैकी चार सामने जिंकून पॉइंट टेबलमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे.