breaking-newsक्रिडा

जगातील सर्वात वेगवान धावपटू उसेन बोल्टला कोरोनाची लागण

किंग्सटन – कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. जगातील सर्वात वेगाने धावणारा आणि आठ वेळा ऑलिंपिक सुवर्ण पदक विजेता उसेन बोल्ट याचीही कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. बोल्टला कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळली नाहीत. तरी त्याने स्वत:ला आयसोलेट केले आहे.

बोल्टने ट्विटरवर व्हिडीओ पोस्ट करत म्हटले आहे की, ‘मी कोरोना पॉझिटिव्ह आहे. शनिवारी माझी चाचणी करण्यात आली. मी सध्या आयसोलेशनमध्ये राहत आहे’.

१०० मीटर आणि २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत जागतिक विक्रम करणाऱ्या बोल्टने गेल्या आठवड्यात त्याचा ३४वा वाढदिवस जल्लोषात साजरा केला होता. या वाढदिवसाच्या पार्टीत त्याने सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले नाही. पार्टीत मास्कचा वापर केला गेला नव्हता. आता बोल्टच्या संपर्कात आलेल्या सर्वांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे.

उसेन बोल्टने ऑलिम्पिक स्पर्धेत ८ सुवर्णपदके मिळवली आहेत. १०० मीटर आणि २०० मीटर अंतर सर्वात वेगाने धावण्याचा जागतिक विक्रम त्याच्या नावावर आहे. बोल्टने १०० मीटर अंतर ९.५८ सेकंदात तर २०० मीटर अंतर १९.१९ सेकंदात पार केले होते. या वर्षी मे महिन्यात बोल्टला कन्यारत्न झाले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button