breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी
ख्रिस गेलने एका क्लबमध्ये महिला डान्सर्ससोबत केलेला बेभान डान्स व्हायरलं…
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/Untitled-42.png)
वेस्ट इंडिजचा दमदार सलामीवीर ख्रिस गेल . तो जेव्हा मैदानात उतरतो तेव्हा गोलंदाजांना पळता भुई थोडी होते. आपल्या उत्तुंग षटकारांसाठी ओळखला जाणारा गेल हा मैदानाबरोबरच मैदानाबाहेरील गोष्टींसाठी कायम चर्चेत असतो. पुन्हा एकदा गेल चर्चेत आला आहे तो त्याच्या डान्समुळे…
गेलला क्लबिंगची विशेष आवड आहे. असाच एका क्लबमधील व्हिडिओ त्याने पोस्ट केले आहेत. मात्र या व्हिडिओंमध्ये तो काही महिला डान्सर्सबरोबर बेभान होऊन डान्स करताना दिसत आहे.व्हिडिओच्या सुरुवातीलच गेल डान्स फ्लोअरवर येतो. तो हळूहळू डान्स फ्लोअरवरील तरुणींबरोबर नाचू लागतो.
अनेकांनी गेलच्या या डान्सचे कौतुक केलं आहे तर काहींनी त्याच्या या डान्स स्टेपवर नाराजी व्यक्त केल्याचे पहायला मिळत आहे.