Breaking-newsक्रिडा
खेळाडूंना टी-20 विश्वचषकासाठी चार्टर विमानाने ऑस्ट्रेलियात आणावे : हॉग
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/Hogg.jpg)
सिडनी |अॉस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू ब्रॅड हॉगने टी-२० विश्वचषकाच्या आयोजनावर एक उपाय सुचवला आहे, ज्यामुळे स्पर्धा नियोजित वेळेत घेतली जाऊ शकते.
हॉगने म्हटले की, “स्पर्धा रद्द केली जाऊ नये. कारण, जगभरातील क्रिकेटप्रेमी त्याची वाट पाहत आहेत. ते आपल्या आवडत्या खेळाडूंना पाहू इच्छितात. त्यासाठी सामने रिकाम्या स्टेडियममध्ये खेळवले तरी चालेल. स्पर्धेची तारीख पुढे ढकलली जाऊ नये. कारण, पुढील वर्षी भारतात पुन्हा एक टी-२० विश्वचषक होणार आहे. सहा-आठ महिन्यांच्या अंतरात अशा दोन स्पर्धा होणे योग्य नाही. खेळाडूंसाठी चार्टर विमानांचा वापर करावा.
चार्टर विमानाने येणाऱ्या सर्व खेळाडूंची चाचणी करावी. त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला तर त्यांना ऑस्ट्रेलियात पाठवले जावे.