Breaking-newsक्रिडा
ऋषभ पंत कुठे?; हा घ्या चौथ्या क्रमांकावर – रोहित शर्मा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/07/rohit-sharma-rishabh-pant.jpg)
अजिंक्य भारताला अखेर विश्वचषक स्पर्धेत पराभवाचे तोंड पाहावे लागले. लियाम प्लंकेट आणि ख्रिस वोक्स यांनी टिच्चून मारा करत विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडला विजयपथावर आणलं आहे. ३३८ धावांचा पाठलाग करताना भारताचा संघ ३०६ धावांपर्यंतच मजल मारु शकला. इंग्लंडने ३१ धावांनी सामन्यात बाजी मारत उपांत्य फेरीसाठी आपलं आव्हान जिवंत ठेवलं. इंग्लंडचा साखळी फेरीत आता न्यूझीलंडशी सामना होणं बाकी आहे.
इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात विजय शंकरच्या जागी ऋषभ पंत याला संधी मिळाली. पण पंत फारशी चांगली कामगिरी करू शकला नाही. कर्णधार कोहली माघारी परतल्यानंतर ऋषभ पंत चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी आला. त्यावेळी भारताला जलद धावा करण्याची गरज होती. पण त्याला ते शक्य झाले नाही. १९ चेंडूत २२ धावा करून तो माघारी परतला. त्यानंतर त्याच्या समावेशावरुन अनेक चर्चा रंगल्या.