breaking-newsक्रिडाराष्ट्रिय

उपांत्य फेरीत सायना नेहवाल पराभूत, कांस्यपदकावर समाधान

भारताची फुलराणी सायना नेहवालला आशियाई क्रीडा स्पर्धेत अखेर कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं आहे. उपांत्य फेरीत चीन तैपेईच्या ताई त्झु यिंगने सायनावर २१-१७, २१-१४   अशा दोन सरळ सेट्समध्ये मात केली. ३६ वर्षांनी आशियाई स्पर्धांमध्ये भारताला मिळालेलं हे पहिलं पदक ठरलं आहे. यिंगवर मात करुन सायना स्पर्धेची अंतिम फेरी गाठेल अशी अनेक भारतीय क्रीडा रसिकांना आशा होती. मात्र प्रत्यक्ष सामन्यात यिंगने पूर्णपणे आपलं वर्चस्व गाजवलं. पहिल्या सेटमध्ये यिंगने सायनाची अक्षरशः दमछाक करवली. मात्र सायनानेही लगेच हार न मानता यिंगला चांगली झुंज देण्याचा प्रयत्न केला, मात्र यिंगच्या झंजावाती खेळासमोर तिची डाळ शिजू शकली नाही.

दुसऱ्या सेटच्या सुरुवातीलाही यिंगने चांगली आघाडी घेतली होती. मात्र सायनाने दमदार पुनरागमन करत बरोबरी साधली. दुसऱ्या सेटच्या मध्यांतरापर्यंत सायनाने सामन्यात आपलं आव्हान कायम राखलं होतं. मात्र मध्यांतरानंर यिंगने आपल्या खेळाची गती वाढवत सायनाला बॅकफूटला ढकलण्यास सुरुवात केली. एकापाठोपाठ एक स्मॅश आणि ड्रॉपचे फटके लगावत यिंगने सायनावर पुन्हा एकदा कुरघोडी केली. अखेर २१-१४  च्या फरकाने दुसरा सेट सहज जिंकत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button