आयएफसीआर आरपीएल अर्बन बॅटल क्रिकेट स्पर्धा: पिंपरी पॅंथर्स संघाला विजेतेपद
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/Winner-Team-Pimpri-Panthers.jpg)
पुणे– पिंपरी पॅंथर्स संघाने रायगड वॉरियर्स संघाचा 37 धावांनी पराभव करत येथे सुरू असलेल्या आयएफसीआर रोटरी डिस्ट्रीक्ट 3131 तर्फे आयोजित आयएफसीआर आरपीएल अरबन बॅटल टी 15 स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
पहिल्यांदा खेळताना उत्कृष्ट संघीक खेळाचे प्रदर्शन करत शेखर दालमीयाच्या 30, रोहन घाडगेच्या नाबाद 26, विजय कोतवालच्या नाबाद 21, महेश दिवटेच्या 19, धिरज कदमच्या 18 व सुनिल रोहीलाच्या 16 धावांच्या बळावर पिंपरी पॅंथर्स संघाने 15 षटकांत 6 बाद 149 धावा केल्या. 149 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अविनाश बारणेच्या अचूक गोलंदाजीपुढे रायगड वॉरियर्स संघला 15 षटकांत 5 बाद 112 धावाच करता आल्याने त्यांना 37 धावांनी पराभुत व्हावे लागले. यावेळी विक्रम काईयाने 30 तर प्रितम काईयाने 19 धावा करून संघाच्या डावाला आकार दिला. सुनिल मंदन, विजय कोतवाल व फैयाझ लांडगे यांनी प्रत्येकी एक व अविनाश बारणेने 11 धावांत 2 गडी बाद करून संघाला विजय मिळवून दिला. नाबाद 21धावा व 1 गडी बाद करणारा विजय कोतवाल सामनावीर ठरला.
स्पर्धेतील विजेत्या पिंपरी पॅंथर्स व उपविजेत्या रायगड वॉरियर्स संघाला करंडक पारितोषीक देण्यात आले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण माजी भारतीय क्रिकेटपटू चंदू बोर्डे व रोटरी डिस्ट्रीक्ट गव्हर्नर 3131 चे डॉ. शैलेश पालेकर यांच्या हस्ते करण्यात आले.