breaking-newsक्रिडा

आजही पाऊस आला तर या संघाची अंतिम फेरीत धडक

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य सामन्यात पावसाने खोडा घातल्यामुळे उर्वरीत खेळ राखीव दिवशी होणार आहे. पण हवामान विभागाने मँचेस्टरमध्ये दुसऱ्या दिवशीही पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवशी खेळ होणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, राखीव दिवशीही पावसाने खोडा घातल्यास कोणता संघ अंतिम फेरीत पोहचणार हा प्रश्न चाहत्यांना सतावत असेल.

दुसऱ्या दिवशीही पावसाने व्यत्यय आणला तर भारतीय संघ विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक मारणार आहे. आयसीसीच्या नियमांप्रमाणे उपांत्य सामन्यात पाऊस आल्यास गुणतालिकेत आघाडीवर असलेला संघ अंतिम फेरीत जाणार आहे. गुणतालिकेत भारतीय संघ अव्वल स्थानावर आहे. तर न्यूझीलंडचा संघ चौथ्या स्थानावर आहे. त्यामुळे राखीव दिवशीही पावसाने खोडा घातल्यास भारताला अंतिम फेरीचे तिकीट मिळणार आहे.

उपांत्य सामन्यात पावासाचा व्यत्यय येईपर्यंत न्यूझीलंड संघाने ४६.१ षटकांत पाच बाद २११ धावा केल्या आहे. राखीव दिवशीही जिथे खेळ संपला तेथून सामन्याला सुरूवात होणार आहे. जर दुसऱ्या दिवशीही पावसाने उपस्थिती दर्शवली आणि निर्धारित वेळेत सामना सुरू झाला नाही तर डकवर्थ लुईस नियमांनुसार भारतीय संघाला सुधारित लक्ष दिले जाणार आहे.

पावासाच्या व्यत्यानंतर राखीव दिवशी २० षटकांचा खेळ होणार असेल तर डकवर्थ लुईस नियमांप्रमाणे भारतीय संघाला १४८ धावांचे लक्ष देण्यात येणार आहे. २५ षटकांत १७२ धावा, ३० षटकांत १९२ धावा, ४० षटकांत २२३ आणि ४६ षटकांत २३७ धावांचे सुधारित आव्हान भारतीय संघाला देण्यात येईल. पण दुसऱ्या दिवशीही पावसाने हजेरी लावल्यास भारतीय संघ अंतिम फेरीत पोहचणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button