अोरिसा सरकारने द्युती चंदचे बक्षिस केले दुप्पट
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/08/dutee-chand-696x392.jpg)
जकार्ता – इंडोनेशियात सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेत पदक मिळविण्याच्या बाबतीत महिला खेळाडूसुध्दा आघाडीवर दिसत आहेत. अोरिसा राज्यातील धावपटू द्युती चंद हिने देखील चांगली कामगिरी करत दोन पदके पटकाविली आहेत.
द्युती चंदने 100 मी धावण्याच्या शर्यतीत रौप्यपदकाची कमाई केली होती. त्यावेळी अोरिसा सरकारने तिला दीड कोटी रूपये देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर बुधवारी अव्वल धावपटू द्युती चंदने महिलांच्या 200 मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्यपदकाची कमाई करताना दुहेरी यशाची नोंद केली. द्युती चंदचे या स्पर्धेतील हे दुसरे रौप्यपदक ठरले. त्यामुळे अोरिसा सरकारने तिला आणखी दीड कोटी रूपये देण्याची घोषणा केली आहे. यामुळे तिच्या बक्षिसाची रक्कम आता तीन कोटी झाली आहे.
दरम्यान मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी अशी घोषणा केली आहे की, ‘पुढील वर्षी होणाऱ्या ऑलिम्पिकपर्यत या खेळाडूचा सरावाचा खर्च राज्य सरकार उचलणार आहे’. दोन क्रीडा संघटनांनी अोरिसा अॅथलेटिक्स संघ आणि अोरिसा ऑलिम्पिक संघ यांनी याआधीच द्युती चंद हिला 50-50 हजार देण्याची घोषणा केली आहे.