अजिंक्य रहाणेनं विचारलं वडापाव कसा खायला आवडतो…सचिननेही दिलं मजेदार उत्तर…
टीम इंडियाचा कसोटी संघाचा उप-कर्णधार अजिंक्य रहाणे गेले काही दिवस आपल्या परिवारासोबत वेळ घालवतो आहे. जानेवारी महिन्याच्या अखेरीस भारतीय संघाच्या न्यूझीलंड दौऱ्यात अजिंक्य कसोटी मालिकेत खेळण्यासाठी मैदानात उतरले. त्याआधी अजिंक्यने आपली पत्नी राधिका आणि मुलगी आर्यासोबत मनसोक्स वेळ घालवला. शुक्रवारी अजिंक्य भारत अ संघाकडून खेळण्यासाठी न्यूझीलंडला रवाना होईल.
अजिंक्य रहाणे यानं हातात वडापाव घेत तो फोटो आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला आहे..त्यासोबत त्या फोटोखाली अजिंक्यने तुम्हाला वडापाव कसा खायला आवडतो?? असा प्रश्नही आपल्या चाहत्यांना विचारला…त्यावर अनेकांनी वेगवेगळी मजेदार उत्तर दिली..त्याच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही मजेदार उत्तर दिलं. आणि त्याला कसा वडापाव खायला आवडेनं आणि कोणत्या चटणींसोबत हे देखील आवर्जून सांगितलं आहे…
यावरून एक गोष्ट मात्र लक्षात आली की सेलिब्रेटीज् असो वा क्रिकेटर,किंवा सामान्य माणूस वडपाव म्हटलं की सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटतं…