breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

धक्कादायक! शहापुरात व्यापाऱ्यावर गोळीबार

मुंबई |

शहापुरातील धान्याचे व्यापारी रमेश अग्रवाल (५९) यांच्यावर मंगळवारी रात्री दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी गोळीबार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. रमेश यांच्यावर शहापूर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी ठाणे शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

शहापूर येथील गंगारोड परिसरातून रमेश अग्रवाल दुचाकीवरून घराकडे निघण्याच्या तयारीत असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अग्रवाल यांना उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुढील उपचारासाठी ठाण्यातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या हल्ल्यामागच्या कारणाचा पोलीस शोध घेत आहेत.

वाचा- #Covid-19: महाराष्ट्रात १८ ते ४४ वयोगटातील सर्वांना मोफत लसीकरण! राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय!

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button