breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

धक्कादायक! महिलेचा फोन चोरल्यानंतर दुचाकीवरुन १५० मीटरपर्यंत नेलं फरफटत

नवी दिल्ली |

दिल्लीमधील शालीमार बाग येथे चोरांनी महिलेला १५० मीटरपर्यंत रस्त्यावरुन फरफटत नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सीसीटीव्हीत ही घटना कैद झाली आहे. यावेळी चोरांनी महिलेचा मोबाईल हिसकावून नेला. सीसीटीव्ही कैद झालेल्या या घटनेत रस्त्यावर वाहनांची आणि लोकांची वर्दळ असताना अचानक वेगाने जाणारी एक दुचाकी दिसत आहे. यावेळी दुचाकीच्या मागे असणारी महिला रस्त्यावरुन फरफटत जाताना दिसत आहे. यानंतर रस्त्याच्या मधोमध महिला बेशुद्ध अवस्थेत पडलेली पाहून तिथे उपस्थित नागरिक मदतीसाठी धाव घेतात. यावेळी चोर मात्र तेथून पळून जातात.

पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे चोरांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. याप्रकरणी सध्या तपास सुरु आहे. गेल्यात महिन्यात दिल्लीत ३८ वर्षीय महिला आणि तिच्या मुलीवर चौघांनी हल्ला केला होता. यामध्ये दोन महिला होत्या. शालीमार बागमधील ही घटनाही सीसीटीव्हीत कैद झाली होती. महिला आणि तिच्या मुलीला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button