breaking-newsTOP NewsUncategorizedमहाराष्ट्रमुंबईराजकारण

एसी लोकल बंद करण्याच्या रेल्वे प्रशासनाच्या निर्णयावर आता शरद पवार आक्रमक

मुंबई । महान्यूज ।

एसी लोकल चालवण्याच्या रेल्वेच्या निर्णयावरून सर्वसामन्य प्रवासी आक्रमक झाले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी मध्य रेल्वेच्या कळवा, ठाणे स्थानकावर प्रवाशांनी आक्रमक पवित्रा हाती घेत एसी लोकल चालवण्याच्या निर्णयाविरोधात आंदोलन केले होते. त्यानंतर आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एसी लोकलवरून नागरिकांच्या मागणीकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे. 

ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार आज सकाळी 11 वाजता ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर पोहोचले आहेत. या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी राज्यातील विविध मुद्द्यावर भाष्य केले. तसेच, एसी लोकलच्या मुद्द्यावर बोलताना शरद पवार रेल्वे प्रशासनावर आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

“जितेंद्र आव्हाड यांनी एसी लोकलचा प्रश्न मांडला. एसी गाड्यांमुळे नोकरदार वर्ग, मध्यमवर्गीय आणि कष्टकरी यांच्यावर जास्त परिणाम होतो. एक गाडी रद्द करुन हा प्रश्न सुटणार नाही. त्यामुळे सामान्यांच्या वेदनेत वाढ होत आहे. एसी लोकल बंद केल्या पाहिजेत आणि सर्वसामान्यांच्या प्रवासाचे साधन उपलब्ध केले पाहिजे. सामान्यांच्या यातना कमी करण्यासाठी नागरिकांच्या मागणीकडे लक्ष दिले नाही, तर देशपातळीवर रेल्वेच्या प्रमुखांसोबत बैठक घेत, त्यांना निर्णय घेण्यास भाग पाडू”, असा इशारा शरद पवार यांनी दिला.

विधासभेच्या पावसाळी अधिवेशात माजी मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एसी लोकलचा मुद्दा उपस्थित केला होता. तसेच, वेळेत एसी लोकलचा निर्णय रद्द न केल्यास सर्व स्थानकांवर आंदोलन केले जाईल असा इशारा आव्हाड यांनी दिला होता. त्यानंतर मध्य रेल्वेच्या बेलापूर आणि ठाणे स्थानकात प्रवाशांनी आंदोलन केले होते.

प्रवाशांच्या या आंदोलनानंतर मध्य रेल्वेने एसी लोकल रद्द करण्याचा निर्णय घेतला. मध्य रेल्वेने निर्णय मागे घेतल्यानंतर प्रवाशांच्या आंदोलनाला यश आले. त्यामुळे सर्व आंदोलक प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. त्यानंतर आज शरद पवार यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर रेल्वे प्रशासन राष्ट्रवादीची ही मागणीकडे मान्य करणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button