ताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

शिष्यवृत्ती परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भारत दर्शन अभ्यास दौरा

पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाचा पुढाकार : गुणवंत विद्यार्थ्यांना मिळणार संधी

पिंपरी: सन २०२१-२२ आणि २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात महाराष्ट्र राज्य शासनामार्फत घेण्यात आलेल्या ५ वी आणि ८ वी इयत्तेच्या शिष्यवृत्ती परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे भारत दर्शन अभ्यास दौरा जाहीर केला होता. त्यानुसार या परिक्षेत यशस्वी ठरलेल्या १९ विद्यार्थ्यांची या दौऱ्यासाठी निवड झाली असून त्यांना १९ ते २५ नोव्हेंबर या कालावधीत बंगलोर, म्हैसूर, उटी आणि कोईम्बतूर शहरांची ओळख करून देण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांच्या दक्षिण भारतातील प्रवासाला सुरुवात झाली आहे.

शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या सात समर्पित शिक्षकांचाही या अभ्यास दौऱ्यात समावेश आहे. बंगलोर, म्हैसूर, उटी आणि कोईम्बतूर या चार शहरांना समृद्ध करणार्‍या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक तसेच शैक्षणिक समृद्धीची ओळख करून देण्याच्या दृष्टीने या शैक्षणिक दौर्‍याची रचना केली गेली आहे. या दौऱ्यामध्ये विद्यार्थ्यांना भारतातील प्रसिद्ध शैक्षणिक संस्थांची माहिती घेण्याची तसेच इस्रो (भारतीय अंतराळ संशोधन संस्था) आणि भारतीय विज्ञान संस्था यांच्या वैज्ञानिकांशी संवाद साधण्याची अनोखी संधी देखील मिळणार आहे.

या विद्यार्थ्यांना आयुक्त शेखर सिंह यांनी ध्वनीसंदेशाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अभ्यास दौऱ्याच्या शुभेच्छा दिल्या तसेच अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात आणि आकांक्षा फाऊंडेशन संस्थेच्या संचालक जयश्री ओबेरॉय यांनी विद्यार्थ्यांनी भरलेल्या बंगळुरू विमानतळाकडे निघालेल्या बसला झेंडा दाखवत हिरवा कंदिल दाखवला व अभ्यास दौरा सुरक्षित आणि सुखकर व्हावा यासाठी शुभेच्छा दिल्या.

या विशेष उपक्रमाची सुरूवात महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या सूचनेनुसार करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने आणि शहरातील सार्वजनिक शाळांची गुणवत्ता वाढविण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे. हा भारत दर्शन अभ्यास दौरा शैक्षणिक गुणवत्तेला अग्रस्थानी ठेवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना समृद्ध शैक्षणिक अनुभव प्रदान करण्यासाठी महापालिकेचे एक महत्वाकांक्षी पाऊल आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button