breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

आषाढी वारी : संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे ११ जूनला होणार प्रस्थान

आळंदी : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा आषाढी वारी पालखी सोहळा २०२३ चा दिनक्रम श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान यांच्या कडून जाहीर झाला असून संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान ११जून रोजी होणार आहे. याबाबत ज्ञानेश्वर वीर महाराज यांनी माहिती दिली.

११ जून रोजी सायं ४ वाजता श्रींच्या पालखीचे मंदिरातून प्रस्थान होऊन रात्रीचा मुक्काम (गांधी वाडा) दर्शन मंडप इमारत आळंदी देवस्थान येथे होणार आहे. १२ जून रोजी आळंदीहुन पालखी पुण्याकडे प्रस्थान होणार आहे. त्या रात्री व १३ जूनच्या रात्री पर्यंत पालखी विठोबा मंदिर, भवानी पेठ येथे मुक्कामी असणार आहे.

पुढील प्रमाणे पालखी मुक्काम :

१४ जून रोजी पुण्याहून सासवडकडे प्रस्थान, १५ जून रोजी सासवड मुक्कामी, १६ जून जेजुरी, १७ जून वाल्हे, १८ जून श्रींचे नीरा स्नान, लोणंद, १९ जून लोणंद मुक्कामी, २० जून (चांदोबाचा लिंब उभे रिंगण पहिले) तरडगाव, २१ जून विमानतळ फलटण,२२ जून बरड, २३ जून नातेपुते, २४ जून (पुरंदवडे गोल रिंगण पहिले) माळशिरस, २५ जून (खुडूस फाटा गोल रिंगण दुसरे) रात्री वेळापूर मुक्कामी, २६ जून (ठाकूर बुवाची समाधी गोल रिंगण तिसरे), (पहिला टप्पा संत सोपानदेव भेट) रात्री भंडीशेगाव मुक्कामी, २७ जून (बाजीरावची विहीर उभे रिंगण दुसरे), गोल रिंगण (Alandi) चौथे, रात्री वाखरी मुक्कामी, २८जून (पादुका जवळ आरती व उभे रिंगण तिसरे) पंढरपूर, २९ जूनला पंढरपूर येथे आषाढी एकादशी सोहळा साजरा होईल.

पुढील प्रमाणे पालखीचे प्रस्थान :

३ जुलै पौर्णिमेपर्यंत सोहळा विठ्ठल नगरीत विसावेल. ३ जुलैला गोपालकाला होऊन सोहळा परतीच्या प्रवासासाठी आळंदीकडे निघणार आहे. परतीचा प्रवास ३ जुलै वाखरी, ४ जुलै वेळापूर, ५ जुलै नातेपुते, ६ जुलै फलटण, ७ जुलै पाडेगाव, ८ जुलै वाल्हे, ९ जुलै सासवड, १०जुलै हडपसर, ११ जुलै पुणे, १२ जुलै आळंदी, १३ जुलै आळंदी नगरप्रदक्षिणा, हजेरी मारुती मंदिर नारळ प्रसाद, श्री माऊलीं मंदिर.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button