breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

‘बाळासाहेब ठाकरेंनी शिवसैनिकांच्या..’; सुषमा अंधारे मारहाणप्रकरणी शिंदे गटातील नेत्याची प्रतिक्रिया

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी गंभीर आरोप केले आहेत. आप्पासाहेब यांनी एक व्हिडीओ शेअर करत सुषमा अंधारे पदाधिकाऱ्यांकडे एसी, सोफा आणि फर्निचरसाठी पैसे मागतात, असा आरोप केला आहे. एवढच नव्हे तर सुषमा अंधारेंच्या दोन कानशिलात ठेवून दिल्याचंही ते म्हणाले होते. यानंतर जाधव यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. दरम्यान, यावरून शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संजय शिरसाट म्हणाले की, एवढ्या मोठ्या अॅक्टरला (सुषमा अंधारेंना) मारहाण झाल्याचं ऐकून दु:ख झालं. त्या एक महान कलाकार आहेत. पैसे घेऊन काम करणाऱ्या नेत्या आहेत. आप्पासाहेब जाधव यांचा व्हिडीओ माझ्याकडेही आला असून तो व्हिडीओ मी पाहिला आहे. संबंधित व्हिडीओत त्यांनी आरोप केला की, या बाईने (सुषमा अंधारे) एसी, फर्निचरसाठी पैसे मागितले. एक गोष्ट लक्षात ठेवा, एखाद्या महिलेवर हात उचलण्यापर्यंत मजल जाते, याचा अर्थ आता मर्यादा संपली आहे.

हेही वाचा – श्रीमंत दगडूशेठ गणपती देवस्थानाला ‘क’ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा

त्या बाई असं काहीतरी बोलल्या असतील, ज्यामुळे त्यांनी जे होईल त्या परिणामांना तोंड देईन, या मानसिकतेतून तो व्हिडीओ अपलोड केला. पण त्या बिचाऱ्याला हे माहीत नाही की, या सुषमा अंधारेंनी बाळासाहेब ठाकरेंना म्हातारड्या म्हटलं होतं. त्यांनी उद्धव ठाकरेची वाट लावली. आदित्यला बोकांडी घे आणि ‘लुंगी डान्स’ कर असंही त्या म्हणाल्या होत्या. अशा व्यक्तीला उद्धव ठाकरेंनी मान्य केलं. त्यामुळे तुझ्या निष्ठेचं काहीही मूल्य नाही, असा टोला संजय शिरसाट यांनी लगावला आहे.

बाळासाहेब ठाकरेंनी शिवसैनिकांच्या निष्ठेला महत्त्व दिलं होतं. महिलेवर हात उगारू नये, या मताचा मीही आहे. पण महिलेनं मर्यादा ओलांडू नये. मुख्य म्हणजे हा प्रकार जिल्हा प्रमुखांकडून घडला आहे, इतर कुणाकडून घडला असता तर आपण दुर्लक्ष केलं असतं. उद्धव ठाकरेंनी आता तरी डोळे उघडून या गोष्टींकडे पाहिलं पाहिजे. नाहीतर संजय राऊत आणि सुषमा अंधारेंची जोडी त्यांना (उद्धव ठाकरे) बुडवल्याशिवाय राहणार नाही, असंही संजय शिरसाट म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button