breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘धरणात मुXXपेक्षा थुंकणं बरं’; संजय राऊतांचा अजित पवारांवर पलटवार

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या थुकण्याच्या कृतीनंतर शिंदे गटातील नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रश्नावर उत्तर देत असताना राऊत यांनी आधी थुंकलं आणि त्यानंतर प्रतिक्रिया दिली. यावरून राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रत्येकानं तारतम्य ठेऊन वागावं असा सल्ला दिला आहे. यावरून आता राऊतांनी अजितदादांना प्रत्युत्तर दिलं आहे.

थुंकल्याबाबत माफी मागण्याबाबत संजय राऊत म्हणाले की, रोज १३० कोटी जनतेला माफी मागावी लागेल. रोज कोणी ना कोणी थुंकत असतात. मी सार्वजनिक ठिकाणी थुंकलो नाही. मी राजकीय नेत्यांची नावे थुंकलो नाही, बेईमानांची नावे घेतल्यावर थुंकलो. हा फरक आहे. ज्यांनी महाराष्ट्र, शिवसेना, ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरेंसोबत बेईमानी केली. त्यांचं नाव समोर आल्यावर माझी जीभ चावली गेली, त्यातून ती कृती झाली. यांना काही कळतं का. त्यांना रसायनशास्त्र, जीवशास्त्र, मानसशास्त्र कळतं का? माझ्या इतकं चांगलं संतुलन कोणाचंच नाही. माझ्यामुळे अनेकांचं संतुलन बिघडलं आहे.

हेही वाचा – Balasore Train Accident : बालासोर रेल्वे अपघातात २३८ प्रवाशांचा मृत्यू, ९०० हून अधिक जखमी

संजय राऊतांनी किंवा कुणीही बोलताना संयम राखला पाहिजे, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली. याबाबत संजय राऊत म्हणाले की, धरणांमध्ये मुतण्यापेक्षा थुंकणं चांगलं, असं प्रत्युत्तर दिलं आहे. तसंच ज्याचं जळतं त्याला कळतं. आम्ही भोगतो आहेत. आम्ही सगळं भोगूनाही जमिनीवर उभे आहोत. मी माझ्या पक्षाबरोबर ठामपणे उभे आहोत. आमच्या मनात पक्ष बदलण्याचा आणि संकटं येत आहेत म्हणून भाजपासारख्या पक्षाबरोबर सूत जुळवण्याचा आमचा विचार होत नाही, असंही संजय राऊत म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button