breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

‘शिवसेना नाव आणि धनुष्यबाण मिळवण्यासाठी २००० कोटींचा सौदा झाला’; ठाकरे गटाचा आरोप

आत्तापर्यंत २ हजार कोटींच डील झाली आहे

मुंबई : शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह निवडणूक आयोगाने शिंदे गटाला बहाल केले. या निर्णयामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. तर दुसरीकडे शिंदे गटातील नेते राज्यभर जल्लोष करत आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे आणि भाजपवर गंभीर आरोप केला आहे.

शिवसेना नाव आणि धनुष्यबाण मिळवण्यासाठी २००० कोटींचा सौदा आणि व्यवहार झाल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांनी ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, माझी खात्रीची माहिती आहे. चिन्ह आणि नाव मिळवण्यासाठी आता पर्यंत २००० कोटींचा सौदा आणि व्यवहार झाले आहेत. हा प्राथमिक आकडा आहे आणि १०० टक्के सत्य आहे. बऱ्याच गोष्टी लवकरच उघड होतील. देशाच्या इतिहासात असे कधीच घडले नव्हते, असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

जे लोक न्याय आणि निर्णय विकत घेतात, त्यांच्याबाबत काय बोलणार? मात्र माझ्या पर्यंत मिळालेली खात्रीलायक माहिती अशी आहे की २ हजार कोटींच डील आतापर्यंत झालं आहे. पुरावे लवकरच देऊ, महाराष्ट्राला ते लवकरच समजेल. जो पक्ष आणि नेता नगरसेवकांना विकत घेण्यासाठी ५० लाख आणि १ कोटी रूपये देतो, जो नेता आमदारांना विकत घेण्यासाठी ५० कोटी देतो आणि खासदारांना विकत घेण्यासाठी १०० कोटी देतो त्याने निर्णय विकत घेणं सोपं आहेत, असंही संजय राऊत म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button