breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘पंकजा मुंडेंवर अन्याय झाला आहे’; शिंदे गटातील नेत्याचं मोठं विधान

मुंबई : भाजप नेत्या पंकजा मुंडे पक्षात नारज असल्याच्या चर्चा सातत्याने होत असतात. पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर झालेल्या छापा पडल्यानंतर त्यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली होती. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी महादेव जानकर यांनी पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली. यावरून शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांनी मोठं विधान केलं आहे.

संजय गायकवाड म्हणाले, हे खरं आहे की, पंकजा मुंडेंवर अन्याय झाला आहे. ज्यांच्या वडिलांनी महाराष्ट्रातील जनतेसाठी आणि समजासाठी खूप काही केलं, पण असं कुठेतरी वाटतंय की मागच्या काही निवडणुकांमध्ये त्यांच्यावर अन्याय झाला आहे.

हेही वाचा  –  मराठा आरक्षणावरून पृथ्वीराज चव्हाण यांचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप; म्हणाले..

महादेव जानकर नेमकं काय म्हणाले?

भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी मला मुलगा मानले होते. पंकजा मुंडे या माझ्या बहीण आहेत. माझ्या पक्षाचे १४५ आमदार निवडून आले, तर मी नक्कीच पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री करेल. आम्हाला भाजपामध्ये पक्ष विलीन करा, असे सांगण्यात आले होते. पण आम्ही पक्ष विलीन केला नाही. आम्ही होतो म्हणून भाजपाचे सरकार आले. पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजपाला कोणी ओळखत नाही. भाजपा हा छोट्या छोट्या पक्षाला टेकू बनवत आणि मोठा होऊ पाहत आहे, असं महादेव जानकर म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button