breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

“राज ठाकरे यांना मारण्याची सुपारी..”; मनसे नेत्याचा मोठा गौप्यस्फोट

संजय राऊत घाटकोपरमध्ये दगड मारत फिरतील

मुंबई : शिवसैनिकांच्या माध्यमातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मारण्याची सुपारी देण्यात आली होती, असा गौप्यस्फोट मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केला आहे.

नारायण राणे यांनी शिवसेनेच्या माध्यमातून मालवणमध्ये जाण्याची हिंमत नव्हती. मुंबईतील गुंडांना शिवसेनेच्या माध्यमातून राज ठाकरेंच्या घातपाताचं षडयंत्र होतं. नारायण राणेंवर नाव येण्यासाठी मालवणमध्ये घातपाताचं षडयंत्र आखलं होतं. आपल्या पक्षातील प्रतिस्पर्धीचा काटा काढता येईल, अशा प्रकारचं नीच राजकारण झालं होतं, असा गंभीर आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे.

राज ठाकरेंचं नाव बाळासाहेबांच्या नंतर नेता म्हणून पुढे येत होते, तेव्हा १९९५ ते २००० पर्यंत त्यांच्या विरोधात षडयंत्र रचायला सुरूवात झाली. २००० साली उद्धव ठाकरेंची अस्वस्थता वाढायला लागली. २००२ मध्ये बाळासाहेबांच्या इच्छेखातर राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंचे नाव कार्याध्यक्ष म्हणून घोषित केले, असंही संदीप देशपांडे म्हणाले.

त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या भावनिक आव्हानाला तुम्ही बळू पडू नका. काही दिवसांनी ते संजय राऊत घाटकोपरमध्ये दगड मारत फिरतील की शिवसेनेचा मुख्यमंत्री म्हणून. या संपूर्ण लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्यांसाठी फक्त कृष्णकुंजचे दरवाजे उघडे होते. उद्धव ठाकरे हे फक्त फेसबुक लाईव्हमधून बोलायचे. आता त्यांच्याकडे एकच अस्त्र उरलं आहे ते म्हणजे सहानुभूतीचे. ते भोळा चेहरा करून तुमच्याकडे येतील, असं संदीप देशपांडे म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button