breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रमुंबईराजकारण

रुपीनगर- तळवडेत भाजपाचा ‘जय श्री राम’; मंदिराच्या कामाचे भूमिपुजन

  •  श्री राम मित्र मंडळ ट्रस्टचा विधायक पुढाकार
  •  आमदार महेश लांडगे, हिंदू राष्ट्रसेनेचे धनंजय देसाई यांची उपस्थिती

पिंपरी | प्रतिनिधी

रूपीनगर-तळवडेमध्ये श्री राम मित्र मंडळ ट्रस्टच्या राम मंदिराचे भूमिपूजन भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे, हिंदू राष्ट्र सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय देसाई यांच्या हस्ते झाले. ट्रस्टच्या कार्यकर्त्यांनी मागील चार वर्षांपासून प्रयत्न करत राम मंदिरासाठी एक हजार चौरासफूट जागा विकत घेतली. त्या जागेत राम मंदिराच्या कामाचा भूमिपूजन सोहळा पार पडला.

याकामी रवी एकशिंगे, मचिंद्र शिंदे, सागर देवकर, अनिकेत उबाळे, बालाजी कांबळे, निखिल उबाळे, प्रथमेश पाटील, निखिल सुतार यांनी मंदिराच्या जागेसाठी प्रयत्न केले. आमदार महेश लांडगे यांनी या श्री राम मंदिराचे काम बंद पडू देणार नाही, असा कार्यकर्त्यांना विश्वास दिला. गोवा येथे निवडणुकीच्या कामातून वेळ काढून लांडगे या कार्यक्रमासाठी आले. याबद्दल मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आमदार लांडगे यांचे आभार मानले.

धनंजय देसाई म्हणाले, “आमदार महेश लांडगे म्हणजे पुरुषार्थ असलेले आमदार आहेत. धाडसी, कर्तृत्ववान नेतृत्व आणि पुढे नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात जाण्याची शक्यता असलेला एकमेव नेता महेश लांडगे हे आहेत. परंपरेचा वारसा घेऊन आपण जन्माला आलो आहोत. जातीच्या नावाने विलगिकरण करणारी षडयंत्र आपल्या देशात रचली जात आहेत. भगवान बुद्ध, माऊली, तुकोबा असे कुणाचेही पाईक असलो तरी श्री राम ही आपली जागतिक ओळख आहे. जात ही गल्लीपुरती मर्यादित आहे. राम सर्वत्र व्याप्त आहे. पुरुषार्थ हा पराक्रमाशी मोजला जातो. कुटुंबाची कोणतीही मोठी राजकीय पार्श्वभूमी नसताना आमदार महेश लांडगे यांनी स्वतःचे राजकीय आणि सामाजिक अस्तित्व लोकांच्या मनात निर्माण केले, असेही धनंजय देसाई यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button