breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

रोहित शर्माचा विश्व विक्रम! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला खेळाडू

Rohit Sharma | भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा रोज नवनवे विक्रम रचत आहे. अशातच रोहित शर्मा इंदूरच्या होळकर स्टेडियमवर रविवारी अफगाणिस्तानविरुद्धचा दुसरा टी-२० सामना खेळला आहे. यादरम्यान रोहितने इतिहास रचला आहे.

टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात १५० सामने खेळणारा रोहित शर्मा हा जगातील पहिला पुरुष क्रिकेटपटू ठरला आहे. आतापर्यंत कोणत्याही क्रिकेटपटूला हे स्थान मिळवता आले नाही.

रोहितनंतर टी-२० क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक सामने खेळण्याच्या बाबतीत आयरिश फलंदाज पॉल स्टर्लिंगचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. पॉलने १३४ सामने खेळले आहेत. त्याच्यानंतर आयरिश खेळाडू जॉर्ज डॉकरेल आहे. जॉर्जने १२८ सामने खेळले आहेत.

हेही वाचा   –    शरद मोहोळ खून प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक, काही वर्षापूर्वी केला होता भाजपात प्रवेश

त्याचबरोबर पाकिस्तानचा फलंदाज शोएब मलिक चौथ्या स्थानावर आहे. शोएबने १२४ सामने खेळले आहेत. न्यूझीलंडचा खेळाडू मार्टिन गप्टिल पाचव्या क्रमांकावर आहे. गप्टिलने १२२ सामने खेळले आहेत. विराट कोहलीबद्दल बोलायचे झाले तर तो या यादीत १०व्या स्थानावर आहे. कोहली आपला ११६ वा सामना खेळत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button