breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

#RainAlert: कोकण, मध्य महाराष्ट्रात आजही वादळी वा-यांसह पावसाची शक्यता- हवामान विभाग

मुंबई: मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह काल (3 ऑक्टोबर) संध्याकाळपासून पावसाने चांगलाच जोर धरला. मेघगर्जना आणि ढगांच्या कडकडाटासह काल मुंबईत चांगला पाऊस बरसला आहे. आज सकाळपर्यंत मुंबईतील अनेक भागांत पावसाची संततधार सुरु असून भांडूप, मुलूंडमध्ये पावसाने विश्रांती घेतलेली आहे. महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्रात देखील पावसाचा जोर कायम असून आजही या भागांमध्ये वादळी वा-यांसह पाऊस बरसणार असल्याची शक्यता हवामान विभागाचे उपसंचालक के एस होसाळीकर यांनी दिलेली आहे.

महाराष्ट्रामध्ये परतीच्या पावसाला सुरुवात झाली असून 5 ऑक्टोबर दरम्यान मध्य महाराष्ट्र, कोकणातही काही भागात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज मुंबई वेधशाळेने वर्तवलेला आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबईत मागील 24 तासांत समाधानकारक पाऊस पडलेला आहे. या परिसरात 79-100 मिमी इतकी पावसाची नोंद करण्यात आली आहे. IMD नुसार आजही अनेक भागात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button