Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

‘विकासकामांच्या जोरावर विजय मिळवू’; आमदार माधुरी मिसाळ यांचा विश्वास

पुणे : मागील १५ वर्षांत मतदारसंघात केलेल्या नियोजनबद्ध विकासाच्या जोरावर मोठा विजय मिळवू, असा विश्वास भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, आरपीआय (ए) आणि महायुतीच्या पर्वती विधानसभा मतदारसंघातील उमेदवार माधुरी मिसाळ यांनी व्यक्त केला.

मिसाळ यांच्या प्रचारार्थ बिबवेवाडी ओटा, बिबवेवाडी गाव, पापळ वस्ती, महेश सोसायटी, लोअर अप्पर इंदिरानगर परिसरात सोमवारी पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी मतदारांशी संवाद साधला. यावेळी दीपक मिसाळ, करण मिसाळ, मानसी देशपांडे, श्रीकांत पुजारी, संतोष नांगरे,

अविनाश गायकवाड, सुभाष जगताप, शिवाजी गदादे-पाटील, बाबुराव घाटगे, अनुसया चव्हाण, मनोज देशपांडे, प्रशांत दिवेकर, रघुनाथ गौडा, विशाल पवार, प्रीतम नागपुरे, नवनाथ वांजळे, अजय भोकरे, शिवम देशपांडे, ज्ञानेश्वर मानकर, राजेंद्र बिबवे, नितीन बेलदरे, अरुण वीर, प्रभावती जागडे उपस्थित होते.

हेही वाचा    –      आमदार महेश लांडगे यांनी पक्षभेद बाजूला ठेवून कामे केली : माजी महापौर मंगला कदम

मिसाळ म्हणाल्या, “मेट्रो, स्वारगेट मल्टिमोडल हब, बिबवेवाडीतील ईएसआयसीच्या जागेत ५०० खाटांचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय, करोना काळात केलेले मदतकार्य, समान पाणीपुरवठा योजना, पु. ल. देशपांडे उद्यानात दिल्ली हटच्या धर्तीवर कलाग्राम, आनंददायी शिक्षणासाठी मूलभूत सुविधा, सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपूल, पर्यायी रस्ते,

पर्वती टेकडीचे सुशोभिकरण, तळजाई वन आराखडा, पूरग्रस्त भागातील सीमाभिंतींचे बांधकाम, वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी उपाययोजना आणि प्राधान्यक्रमाने १७६ कोटी रुपयांच्या आमदार आणि विशेष निधी मतदारसंघात खर्च केला आहे. त्यामुळे आपला विजय निश्चित आहे.’

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button