Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले; “ बेगानी शादी में…”

आळंदी : शरद पवार आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार का? यावर राज्यभर चर्चा आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान केलं आहे. शरद पवार यांनी नुकतंच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावरून वक्तव्य केलं होतं. याची चर्चा राज्यभरासह देशभरात आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. देवेंद्र फडणवीस हे आळंदीत पत्रकारांशी बोलत होते.

संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या ७५० व्या जन्मोत्सव साजरा केला जात आहे. यानिमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माऊलींच्या समधीचं दर्शन घेतलं.

हेही वाचा –  भारताचा पाकिस्तानवर डिजिटल स्ट्राईक! हल्ल्यामुळे तब्बल ‘इतके’ एक्स अकाउंट्स केले बंद

देवेंद्र फडणवीस म्हणाले, माऊलींच्या ७५० व्या जन्मोत्सवानिमित्त दर्शन घेतलं. याच समाधान आहे. ज्ञानेश्वर माउलींनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला, त्यावर संत तुकोबांनी कळस चढवला. संतांचे विचार समाजात रुजले पाहिजेत. तेच आपल्याला दिशा देतील. पुढे ते म्हणाले, पाकिस्तान हे आतंकवादी राष्ट्र आहे. ते आतंकवादाच नेहमीच समर्थन करतात. आता भारत थांबणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आपली सेने योग्य उत्तर देत आहे. आम्ही देखील राज्यात बैठक घेऊन खबरदारी घेत आहोत असं ही फडणवीस म्हणाले.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या प्रश्नावर फडणवीस यांनी मिश्कील उत्तर दिलं. राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत मला विचारण्या ऐवजी सुप्रिया सुळे किंवा अजित पवारांना विचारा. बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना का करत आहांत असं म्हणून फडणवीस निघून गेले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button