ताज्या घडामोडीपुणे

घाऊक बाजारात फळभाज्यांच्या दरात वाढ

आवक वाढल्याने कोथिंबिर, मेथीच्या दरात अल्पशी घट

पुणे : घाऊक बाजारात मटार, ढोबळी मिरची, घेवड्याच्या दरात वाढ झाली. भुईमुग शेंग, शेवग्याच्या दरात घट झाली. अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. आवक वाढल्याने कोथिंबिर, मेथीच्या दरात अल्पशी घट झाली आहे.

श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील घाऊक बाजारात रविवारी (१२ मे) राज्य, तसेच परराज्यातून मिळून ११० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेशातून मिळून १० ते १२ टेम्पो हिरवी मिरची, आंध्र प्रदेश, कर्नाटकातून चार हजार खोकी तोतापुरी कैरी, गुजरात, कर्नाटकातून मिळून ४ ते ५ टेम्पो कोबी, कर्नाटकातून ३ ते ४ टेम्पो घेवडा, पावटा ३ टेम्पो, तसेच बेळगावहून २ टेम्पो भुईमूग शेंग, आंध्र प्रदेश, तामिळनाडूतून ५ ते ६ टेम्पो शेवगा, हिमाचल प्रदेशातून ५ ट्रक मटार, मध्य प्रदेशातून ९ ते १० टेम्पो लसूण अशी आवक परराज्यातून झाली, अशी माहिती मार्केट यार्डातील ज्येष्ठ अडते विलास भुजबळ यांनी दिली.

पुणे विभागातून सातारी आले ५०० ते ६०० गोणी, भेंडी आणि गवार प्रत्येकी ७ ते ८ टेम्पो, टोमॅटो १० हजार पेटी, हिरवी मिरची ४ ते ५ टेम्पो, ढोबळी मिरची १० ते १२ टेम्पो, कोबी ५ ते ६ टेम्पो, फ्लॉवर ८ ते १० टेम्पो, ढोबळी मिरची ८ ते १० टेम्पो, काकडी ८ ते १० टेम्पो, तांबडा भोपळा १० ते १२ टेम्पो, कांदा ८० ट्रक तसेच इंदूर, आग्रा आणि स्थानिक भागातून ४५ ट्रक बटाटा अशी आवक झाली.

कोथिंबीर, मेथी, कांदापात, चुक्याच्या दरात ५ ते १० टक्क्यांनी घट झाली. अन्य पालेभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. मार्केट यार्डातील तरकारी विभागात रविवारी कोथिंबीर दीड लाख जुडी, मेथीच्या ६० हजार जुडी अशी आवक झाली. घाऊक बाजारात शेकडा पालेभाज्यांचे दर कोथिंबीर – ८०० ते १५०० रुपये, मेथी – १००० ते १५००रुपये, शेपू – ८०० ते १००० रुपये, कांदापात – ८०० ते १२०० रुपये, चाकवत – ४०० ते ७०० रुपये, करडई – ३०० ते ७०० रुपये, पुदिना – ३०० ते ६०० रुपये, अंबाडी – ४०० ते ७०० रुपये, मुळा – ८०० ते १२०० रुपये, राजगिरा – ४०० ते ७०० रुपये, चुका – ५०० ते ८०० रुपये, चवळई – ४०० ते ७०० रुपये, पालक – ८०० ते १५०० रुपये असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button