breaking-newsताज्या घडामोडीपुणे

मॅट्रिमोनियल साईटवरुन लग्न जुळवायला गेली अन् ४० लाख गमवून बसली

पुणे : अनेक जणांची लग्न या मॅट्रिमोनियल साईटवरुन जुळल्याचं आपण पाहिलं आहे. सध्या सगळीकडेच लग्न जुळवण्यासाठी मॅट्रिमोनियल साईटचा वापर केला जातो.  पुण्यातील कंम्युटर इंजिनियर तरुणीची सायबर चोरट्यांकडून फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याच मॅट्रिमोनियल साईटवरुन झालेल्या ओखळीतून पुण्यातील एका तरुणीला ४० लाख रुपयांना गंडा घालण्यात आला आहे. विवाहाचे आमिष दाखवून तरुणीकडून तब्बल ४० लाख रुपये लुटले आहेत. याप्रकरणी या तरुणीने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिलीय.

मिळालेल्या माहितीनुसार, या तरुणीने एका विवाहविषयक संकेतस्थळावर नाव नोंदणी केली होती. यावेळी संकेतस्थळावर तिची ओळख राजेश शर्मा या व्यक्तीशी झाली. मी परदेशात एका मोठ्या कंपनीत अधिकारी आहे असं या शर्मा नावाच्या व्यक्तीने तिला बतावणी केली. शर्माने विवाहास होकार दिल्यानंतर त्या दोघांमध्ये संपर्क वाढला. त्याने लवकरच भारतात येऊन एक व्यवसाय सुरू करणार असल्याचे तरुणीला सांगितले. यासह त्याने एक बनावट विमान प्रवासाचे तिकिट तिला पाठविले.

हेही वाचा – ‘देशात पंतप्रधान मोदींच्या हत्येचा कट रचला जातोय’; भाजप नेत्याचं मोठं विधान

मी दिल्ली विमानतळावर आलोय पण परदेशी चलनाबाबत माझी चौकशी करण्यात येत असल्याचे त्याने या तरुणीला फोन करून सांगितलं. काही शुल्क या ठिकाणी असलेल्यांना द्यावा लागेल असे सांगून त्याने तरुणीला बँक खात्यात त्वरित पैसे जमा कर असं सांगितलं. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन या तरुणीने त्याच्या बँक खात्यात ४० लाख ५० हजार रुपये जमा केले. पैसे जमा केल्यानंतर शर्माने त्याचा मोबाइल क्रमांक बंद केला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने पोलीस ठाण्यात धाव घेतली.

नागरिकांनी फसवणूक झालेले बनावट ईमेल किंवा या सगळ्यासंदर्भात काळजी बाळगावी. सोशल मीडियावर बदनामी झाल्यास काय?  याची भिती न बाळगता स्वतः सोबत घडलेल्या फ्रॉडबाबत तसेच कारवाईच्या भितीस बळी न पडता अशा फसवणुकीच्या घटनांबाबत आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनला सायबर पोलीस स्टेशन [email protected] या वेबसाईटवर तक्रार दाखल करावी. नाहीतर  /020 – 297710097, 7058719371या नंबरवर तक्रार नोंदवावी, असं आवाहन पुणे सायबर पोलिसांकडून करण्यात आलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button